आज देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर केला. अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रविकांत तुपकर म्हणाले की, हमी भावाचा कायदा या अर्थसंकल्पामध्ये करणं गरजेचं होते. कर्जमुक्तीसुद्धा केली गेलेली नाही आहे. 2014पासून जेवढे अर्थसंकल्प झाले असतील मोठ मोठ्या घोषणा होतात, मात्र त्या घोषणांचे नंतर काय होते याच्याकडे कोणी मागे वळून बघत नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, 2014पासून जेवढ्या अर्थसंकल्पाच्या घोषणा झाल्या त्याचे ऑडीट झाले पाहिजे. केलेल्या घोषणा आणि त्याचे पुढे काय झालं. कापसाच्या जाती विकसित करणार असे ते म्हणतात पण कापसाच्या भावाचं काय. तुम्ही उत्पादन वाढवण्याची घोषणा करता पण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने काही अर्थसंकल्पामध्ये बोललेलं नाही आहे. ठोस असं शेतकऱ्यांच्यादृष्टीने काही नाही. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हातात काही मिळेल असं मला वाटत नाही. असे रविकांत तुपकर म्हणाले.