ताज्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप? रविंद्र धंगेकर शिवसेनेत जाणार?

रवींद्र धंगेकरांच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा

Published by : Prachi Nate

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतीच काही दिवसांपुर्वी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीनंतर त्यांनी लगेच स्पष्ट केल की, ही भेट केवळ वैयक्तिक कामासाठी घेतली गेली होती. त्यामुळे या भेटी दरम्यान चर्चांना आलेल उधाण कमी झालेल पाहायला मिळालं. मात्र आता पुन्हा एकदा आमदार रविंद्र धंगेकर चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत असताना पाहायला मिळत आहे.

अशातच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍समधील फोटोत त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केलेलं आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर लवकरच शिवसेनेत जाणार का? अशा चर्चा सुरु आहेत. रवींद्र धंगेकरांनी दिवसभरात दुसऱ्यांदा स्टेटस बदललं 'राजा हरला काय राजा जिंकला काय, राजा हा राजा असतो...निष्ठेत तडजोड नाही' रवींद्र धंगेकरांच्या नव्या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याचपार्श्वभूमिवर एकनाथ शिंदे शिवसेनचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत म्हणाले की, " रवींद्र धंगेकर यांनी जर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला तर आम्हाला सर्वानांच आनंद होणार आहे. रवींद्र धंगेकर हे हाडाचे कार्यकर्ते आहेत त्याचसोबत लोकांमध्ये जाऊन काम करणारा चेहरा आहे, त्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत माझ्यासोबत सगळ्यांच माहित आहे. त्यामुळे जर असं एखादं नेतृत्त्व आम्हाला मिळालं आणि त्यांनी शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली काम केल, तर आम्हाला सगळ्या आनंदच होणार आहे".

त्याचसोबत ऑपरेशन टायगरवर रवींद्र धंगेकर यांच्यासोबत कोणती चर्चा झाली आहे का? यावर उदय सामंत म्हणाले की, "मी आजच रवींद्र धंगेकर यांना भेटलो पण, ते एका कामासाठी मला भेटायला आले होते. मी त्याच ट्वीट सुद्धा केलेलं आहे. योगायोगाने त्यांच्या चिरंजीवांचा वाढदिवस देखील काल झाला आणि तो सुद्धा आम्ही साजरा केला. पण आमची राजकारणा संबंधी कोणतीच चर्चा झाली नाही".

रवींद्र धंगेकर यांच्या स्टेटसवर सामंत म्हणाले की, "हा स्टेटस त्यांनी ठेवला आहे त्यामुळे त्याच्यामागच्या भावना देखील तेच सांगू शकतात. मी लोकशाही मराठीच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी समाजकल्याणाचा जो वसा हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घ्यावा, अशी मी त्यांना विनंती करतो", असं मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी