31 मार्च रोजी रमजान ईद असल्याने यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. या दिवशी बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळते मात्र यावेळी 31 मार्च रोजी बँकांना सुट्टी मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे. RBI प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच बँकेसंबंधीच्या सुट्यांची यादी जाहीर करत असते.
31 मार्च 2025 रोजी संपणाऱ्या 2024-25 या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशोब करण्यासाठी ही यावेळेची 31 मार्चची ईदची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना 31 मार्च 2025 ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मिळत आहे. तर 31 मार्चची सुट्टी ही 1 एप्रिल ला देण्यात येणार आहे. 1 एप्रिल रोजी मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि मेघालय वगळता केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.