Shaktikanta Das Team Lokshahi
ताज्या बातम्या

2000 हजार रुपयाची नोट का बंद केली?; आरबीआय गव्हर्नरने सांगितले कारण

२००० रुपयांची नोट वितरणातून बंद केल्यानंतर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : shweta walge

२००० रुपयांची नोट वितरणातून बंद केल्यानंतर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 2016मध्ये चलनात आणलेली दोन हजाराची नोट चलनातून का मागे घेतली जात आहे याची माहिती दिली.

आरबीआयने दोन हजाराच्या नोटेला क्लिन नोट पॉलिसी अंतर्गत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॉलिसीच्या अंतर्गत आरबीआय हळूहळू दोन हजाराची नोट चलनातून काढून घेणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार केवळ 3.62 लाख कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा व्यवहारात आहेत. मात्र, त्याचं वितरण फारच कमी होत आहे.

2 हजाराची नोट का काढली?

2016मध्ये 500 आणि 1000 ची नोट चलनातून बाद करण्यात आली होती. त्यामुळे पैशांचा तुटवडा निर्माण झाला असता. म्हणून पैशाचे मूल्य कायम ठेवण्यासाठी 2 हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. कारण त्यावेळी मोठ्या प्रमाणावर सिस्टिममधून पैसे काढले जात होते, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. 1 हजार आणि 500 च्या नोटा बंद केल्यानंतर रातोरात 10 लाख कोटी रुपये गायब झाले होते. त्यामुळे दोन हजाराची नोट बाजारात आणल्याचं त्यांनी सांगितलं.

म्हणजे 500 आणि 1000ची नोट बंद केल्यानंतर जो तुटवडा निर्माण होणार होता, तो भरून काढण्यासाठी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. आता मार्केटमध्ये इतर मूल्यांच्या नोटांची कमतरता नाहीये. त्यामुळे दोन हजाराच्या नोटा चलनातून काढून घेतल्या जात आहेत. या नोटा बाजारात आणण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. तसेच इतर नोटाही बाजारात पुरेशा प्रमाणात आहेत. त्यामुळे 2018-2019मध्ये दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती.

नोट बदलण्यासाठी मर्यादा

क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआय अशा प्रकारचे निर्णय नेहमी घेत असते. ज्या लोकांकडे दोन हजाराची नोट आहे. त्यांनी 23 मे 2023 पासून देशातील कोणत्याही बँकेत जाऊन बदलवून घ्याव्यात. नोट बदलण्यासाठी बँकेत गर्दी करू नये. चार महिन्याचा अवकाश आहे. चार महिन्यात कधीही नोटा बदलू शकता. दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयने लिमिट तयार केलं आहे. त्यानुसार एकावेळी केवळ 20 हजार रुपयांपर्यंतचीच रक्कम बदलता येऊ शकते. म्हणजे एकावेळी 20 हजार रुपये बदलून मिळेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जास्त नाटकं केल्यास कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक