shaktikanta das and RBI Team Lokshahi
ताज्या बातम्या

रेपो रेट वाढला, तुमचा घराचा हप्ता वाढणार

Published by : Team Lokshahi

महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी अडचणीत आणली बातमी आली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी हा निर्णय जाहीर केला. आरबीआयने रेपो दरात (Repo Rate) 0.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे आता कर्ज घेणे (Bank Loan) महाग होणार आहे. म्हणेजच आता स्वस्तातील कर्जाचा काळही संपुष्टात आला आहे.

आरबीआयने (RBI) रेपो रेट 0.40 टक्क्यावरून 4.40 टक्के केला आहे. त्याचा परिणाम गृहकर्ज महाग होणार असून सामान्यांचं ईएमआयही वाढणार आहे. सर्वसामान्यांनी घेतलेला घर, कारचा EMI वाढणार आहे. महागाई वाढत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेवर व्याजदर वाढविण्यासाठी दबाव होता.

गेल्या अनेक दिवसांपासून रेपो दर 4 टक्के होता. त्यात आता वाढ होत आहे. बुधवारी आरबीआयने रेपो रेट 0.40 टक्क्यांवरून वाढून 4.4 टक्के झालाय. रेपो रेट-सीआरआर वाढविण्याचा निर्णय आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी जाहीर केला. या निर्णयाचा आम आदमीला महागाईचा शॉक बसला आहे. EMI वाढणार असल्यानं त्यांना आता जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. RBI रेपोरेट वाढवला आहे.

बँकेचे कर्ज घेणाऱ्यांना बसेल फटका

रेपो रेट वाढणे याचा अर्थ बँकांना मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे होय. आरबीआयनं रेपो दर वाढविल्यामुळं इतर बँकांना ग्राहकांना द्यावयाचे कर्जाचे दर वाढवावे लागतील. याचा फटका बँकेकडून घरासाठी कर्ज घेणारे, कारसाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बसेल. रिझर्व्ह बँकेने गेले काही दिवस व्याज दरात कोणताही बदल केला नव्हता. आता रेपो दरात वाढ केला. याचा फटका बँकेचे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बसणार आहे.

शेअर बाजारात घसरण

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याचा घोषणेचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे. या घोषणेनंतर सेन्सेक्स 1300 अंकानी कोसळला आहे. तर, निफ्टी 387 अंकानी कोसळला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test