आरबीआयकडून पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेचे मुख्य गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिलं पतधोरण जाहीर केलं.
आरबीआयकडून रेपो रेटच्या दरात कपात करण्यात आली असून 25 बेसिस पॉईट्सने रेपो रेटच्या दरात कपात करण्यात आली आहे.
रेपो रेट 6.5 टक्क्यांवरुन 6.25 टक्क्यांवर करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता आता कमी होणार असून यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.