आरबीआयची 4 ते 6 डिसेंबर अशी पतधोरण समितीची बैठक जैसलमेर येथे पार पडली, ज्यामध्ये पतधोरण जाहीर केले आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटची आज सकाळी 10 वाजता घोषणा केली. ज्यामुळे आरबीआयकडून ग्राहकांची पुन्हा एकदा घोर निराशा करण्यात आली आहे. ज्यात रेपो रेट 6.5 टक्के कायम राहणार असं सांगण्यात आलं असून ग्राहकांच्या गृहकर्जाचा हप्ता तसाच कायम राहणार आहे. तसेच महागाईसह वाढलेल्या ईएमआयचा ताप सहन करावा लागणार आहे.
2022 ते 2023 पर्यंत रेपो रेटमध्ये 2.50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर 2023पासून आरबीआयने रेपो रोटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही. आरबीआयने व्याजदर "जैसे थे" असं ठेवल्यामुळे कर्जदारांच्या कर्जदरात येणाऱ्या दोन महिन्यात तरी कोणतीही वाढ होणार नाही. तसेच व्याजदर कमी न करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे स्वस्त कर्ज आणि ईएमआय कमी होण्याच्या अपेक्षा उधळून लावल्या आहेत.