ताज्या बातम्या

RBI Repo Rate Update : RBI डिसेंबर MPC मध्ये घेणार मोठा निर्णय!

सामान्य नागरिकांना विशेषतः नवीन कर्ज घेऊ पाहणाऱ्या किंवा घर, कार किंवा इतर कर्ज घेतलेल्या प्रत्येकांसाठी दिलासा देणारी बातमी आरबीआय घेऊन येणार आहे.

Published by : Varsha Bhasmare

सामान्य नागरिकांना विशेषतः नवीन कर्ज घेऊ पाहणाऱ्या किंवा घर, कार किंवा इतर कर्ज घेतलेल्या प्रत्येकांसाठी दिलासा देणारी बातमी आरबीआय घेऊन येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस रेपो दरात अजून कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईएमआय चालू असलेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या संबधित माहिती दिली आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) बैठकीत यासंबधित निर्णय होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एमपीसी बैठक होणार असून यात सध्याचे आर्थिक निर्देशक रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे.

गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी माध्यमांशी बोलताना, चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) ऑक्टोबर महिन्यात दर कपात करण्याची शक्यता आहे. आताची नवीन आकडेवारी याला अधिक बळकटी देत आहे. याबाबतीचा अंतिम निर्णय आरबीआयच्या एमपीसी बैठकीत घेण्यात येईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एमपीसीची बैठक होणार आहे. 3 ते 5 डिसेंबर दरम्यान ही बैठक आयोजित केली असून या विधानामुळे ग्राहकांमध्ये अपेक्षा वाढल्या आहेत. एमपीसीने रेपो दरात फेब्रुवारी ते जून दरम्यान 100 बेस पॉइंट्स कमी करून तो, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये 5.5 टक्क्यांवर कायम ठेवला होता. मध्यवर्ती बँकेचे प्रथम उद्दिष्ट किंमत स्थिरता असून वाढीला पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट हे दुय्यम असल्याचे गव्हर्नर म्हणाले. म्हणूनच, कोणतीच बँक आक्रमक किंवा पूर्णपणे बचावात्मक भूमिका स्वीकारणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून रुपये डॉलरसमोर गंटागली खात आहेत. रुपया आतापर्यंतच्या सर्वात निच्चांकीस्तरावर जाण्याची भीती असून ईएमआय कपात होण्याची शक्यता अगदीच स्वप्नवत असल्यासारखे वाटत आहे. रिअल इस्टेट आणि संबंधित सर्वच क्षेत्रांना या व्याजदरात कपातीचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. पुढच्या आठवड्यात RBI जर रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्स कमी केल्या तर, रेपो दर 5.25% पर्यंत घसरेल, ज्यामुळे कर्जाच्या EMI मध्येही दिलासा मिळू शकेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा