ताज्या बातम्या

Ajit Pawar: जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु! अजित पवारांच्या अडचणीत वाढ?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.

Published by : shweta walge

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. कारण जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यावहार, कोरेगाव येथील एक भुखंड आणि डीस्टलरी प्रकल्पासंर्दभात चौकशी पुन्हा सुरु झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात अँटि करप्शन ब्युरोकडून ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळं अजित पवारांच्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा सुरु होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

इडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करुन चार्जशीट दाखल करताना त्यातुन अजित पवार यांचे नाव वगळले होते. मात्र आता पुन्हा एसीबीने चौकशी सुरु केल्याने खळबळ उडाली आहे.

जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु झाल्याने महायुतीत सर्व आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यानंतर अजित पवार यांनी महायुतीच्या प्रचाराकडे फीरवली पाठ होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा