ताज्या बातम्या

आता अर्जांची पडताळणी होणार, 'या' लाडक्या बहिणी ठरणार अपात्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी सुरू, काही बहिणी ठरणार अपात्र. निकषांमध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्या, चार चाकी वाहन असलेल्या महिलांचा समावेश.

Published by : shweta walge

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या माध्यमातून काही अपात्र लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत अशा अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहीणींच्या अर्जाची आता पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार काही निकष ठरवण्यात आले आहेत.

काय आहेत निकष?

  • ज्या महिलांचा परिवार इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही.

  • ज्या महिलाकडे चार चाकी वाहन आहे त्यांना अपात्र करण्यात येणार आहे.

  • इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल.

  • ज्या महिलांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळे आहे अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे.

  • ज्या महिला लग्न करून परराज्यात स्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता लाडक्या बहीणीचा लाभ घेता येणार नाही.  

दरम्यान या निकषांचा फटका अनेक लाडक्या बहीणींना बसेल अशी भिती आहे. त्यातून अनेक नाव वगळलीही जातील. असं असलं तरीही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी सरसकट केली जाणार नाही असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shiv Sena UBT Dasara Melava | Uddhav Thackeray : कर्जमाफी ते राज-उद्धव युतीवरुन उद्धव ठाकरेंनी सरकारला ठणकावलं

Eknath Shinde On Uddhav Thackeray : "तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये...." सुरतच्या मेळाव्याबाबत एकनाथ शिंदेचं प्रत्युत्तर

Eknath Shinde Dasara Melava Speech : लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य म्हणाले की...

Eknath Shinde On Uddhav Thackeray : "हे पक्षप्रमुख नाही हे ...." एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र