ताज्या बातम्या

राज्यात रेडिरेकनर दर वाढले; कोणत्या जिल्ह्यात किती वाढ?

राज्य सरकारने रेडिरेकनर दरांत वाढ केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्य सरकारने रेडिरेकनर दरांत वाढ केली आहे. रेडिरेकनरच्या दरात वाढ केल्याने मालमत्तांचे दर आता वाढणार आहेत. घरांच्या किंमती वाढल्या असताना नव्या रेडीरेकनर दरांमुळे त्यात आणखी भर पडणार आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात घरांच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे.

राज्य सरकारने रेडिरेकनर दरांत सरासरी ४ टक्के वाढ केली असून, ती आजपासून लागू केली जाणार आहे. मुंबईत 3.39, पुण्यात 4.16, तर ठाण्यात 7.72 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रांत सरासरी 5.95टक्के वाढ करण्यात आली आहे.

मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रांत सरासरी सहा टक्के वाढ करण्यात आली आहे. दोन वर्षांनी पुन्हा रेडिरेकनर दरात वाढ करण्यात आली आहे. राज्यात सरासरी 4.39% मुंबई वगळून व राज्याची एकूण रेडीरेकनर दरातील वाढ ही 3.89% करण्यात आली आहे.

प्रमुख शहरांतील रेडी रेकनरचे दर

ठाणे- 7.72

पुणे - 4.16

पिंपरी चिंचवड - 6.69

मीरा भाईंदर -6.26

कल्याण - डोंबिवली - 5.84

नवी मुंबई -6.75

पनवेल - 4.97

वसई - विरार - 4.50

उल्हासनगर - 9

सांगली - मीरज - कुपवाड - 5.70

इचलकरंजी - 4.46

कोल्हापुर - 5.1

सोलापुर -10.17

नाशिक - 7.31

छत्रपती संभाजीनगर - 3.53

अहिल्यानगर - 4.41

नागपुर -4.23

धुळे - 5.7

मालेगाव -4.88

अमरावती - 8.3

नागपूर एन एम आर डी ए - 6.60

अकोला - 7.39

लातुर -4.1

परभणी - 3.71

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप