uttamrao jankar 
ताज्या बातम्या

बॅलेटवर निवडणूक घेण्याच्या अटीवर राजीनामा देण्यास तयार- उत्तम जानकर

बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर उत्तम जानकर राजीनामा देण्यास तयार आहेत. जयंत पाटील यांनी त्यांना राजीनामा देण्यास परवानगी नाकारली आहे, तर बावनकुळे यांनी मविआ नेत्यांवर टीका केली आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात महायुतीला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशिन आणि निवडणूक आयोगाच्या मतदान पद्धतीवर आक्षेप घेतला जाऊ लागला. सोलापूर येथील मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर अभिरूप मतदानाची मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, जमावबंदीच्या आदेशानंतर रद्द करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रासह देशाचं लक्ष मारकडवाडीकडे वेधलं आहे. राहुल गांधी मारकडवाडीला भेट देणार आहेत. उत्तमराव जानकर यांच्या मतदारसंघ असलेल्या माळशिरसमध्ये मारकडवाडी आहे. मारकडवाडीमध्ये आपल्याला कमी मतं मिळाली असल्याचं जानकर यांचं म्हणणं आहे.

उत्तम जानकर यांनी देशात पोटनिवडणुकीसाठी बॅलेट पेपरवर निवड घेण्यास अडचण काय आहे, असा सवाल उपस्थित केला. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना मविआतील सर्व EVM वर निवडून आलेल्या नेत्यांनी राजीनामा द्यावा, असे म्हटले. बावनकुळे यांच्या मते, राजीनाम्याचे उद्योग खोटारडेपणा करण्यासाठी सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तम जानकर यांच्या राजीनामा देण्याच्या विधानावरून सूचना दिल्या आहेत. "माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका." त्यांनी पुढे म्हटले की, राजीनामा दिला आणि परत निवडणूक झाली तरी तुम्हीच निवडून येणार, परंतु सरकारने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास तयार असल्याचे कबूल करावे. यावर, जयंत पाटील यांनी EVM बाबत शंका उपस्थित करणाऱ्या जनतेला उत्तर दिले, कारण मतदान करणाऱ्यांच्या मनात EVM च्या विश्वासार्हतेबाबत शंका आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी जयंत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, विरोधकांना स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पराभवाची भीती आहे, आणि म्हणूनच शरद पवार व जयंत पाटील धावपळ करत आहेत. बावनकुळे यांनी पुढे म्हटले की, "मारकडवाडीला आलेले लोक हे पवारांचे कार्यकर्ते आहेत."

दरम्यान, विधानसभेत 8 आमदारांचा शपथविधी बाकी आहे. ज्यामध्ये उत्तम जानकरांसह इतर आमदारांचा समावेश आहे. हे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शपथ घेतील. खालील 8 आमदार शपथविधीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत:

  1. उत्तमराव जानकर

  2. विलास भुमरे

  3. वरुण सरदेसाई

  4. मनोज जामसुतकर

  5. विनय कोरे

  6. जयंत पाटील

  7. शेखर निकम

  8. सुनिल शेळके

यांच्या शपथविधीची प्रक्रिया सध्या बाकी आहे. जी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?