Mumbai High Court Job Mumbai High Court Job
ताज्या बातम्या

Mumbai High Court Job : मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर भरतीची संधी; 'इतक्या' पदासाठी होणार भरती

न्यायालयात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली बातमी! मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • न्यायालयात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली बातमी! मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

  • अर्ज प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.

  • या भरतीत एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत.

(Recruitment News ) न्यायालयात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली बातमी! मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्जासाठी अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in आहे. या भरतीत एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता:

उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. इंग्रजी श्रुतलेखनात प्रति मिनिट 100 शब्द आणि टायपिंगमध्ये 40 शब्दांचा वेग आवश्यक आहे. तसेच GCC-TBC परीक्षा (MSCE) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. कायद्याची पदवी असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा व वेतन:

किमान वय 21 वर्षे आणि कमाल 43 वर्षे असून, राखीव प्रवर्गास सवलत मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना 56,100 ते 1,77,500 इतके वेतन तसेच इतर शासकीय भत्ते मिळतील. अर्ज शुल्क 1,000 आहे.

निवड प्रक्रिया:

तीन टप्प्यांमध्ये परीक्षा होईल –

1. लघुलेखन चाचणी (श्रुतलेखन व ट्रान्सक्रिप्शन)

2. टायपिंग चाचणी

3. मुलाखत

अंतिम निवड या तीन टप्प्यांतील गुणांच्या आधारे होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा