ताज्या बातम्या

Pune Sassoon Hospital : ससून रुग्णालयातील ७८९ रिक्त पदांची भरती प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण होणार

आमदार सुनील कांबळे यांनी अधिवेशनात ससून रुग्णालयाच्या समस्यांची मांडणी केली असून, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

Published by : Prachi Nate

आमदार सुनील कांबळे यांनी अधिवेशन सुरु असताना पुण्यातील ससून रुग्णालयाच्या विविध समस्यांची मांडणी केली आणि ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशी मागणी केली. अशातच आता विधानसभेत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पुढील आठ दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान ससून शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा होत असल्याची तक्रार होती याचपार्श्वभूमिवर 12 कोटी 94 लाख रुपयांची औषधांची आणि उपकरणांची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती माधुरी मिसाळ यांनी दिली.

आमदार सुनील कांबळे यांनी अधिवेशनात मांडला ससून रुग्णालयाचा पाढा

याचपार्श्वभूमिवर आमदार सुनील कांबळे म्हणाले की, "ससून रुग्णालयात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. तरी देखील या रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे, शस्त्रक्रियासाठी लागणारी साधनसामग्री आणि औषधांचा तुटवडा वारंवार जाणवतो त्याचसोबत आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व्यवस्थेत गंभीर समस्या आहेत. अत्यावश्यक सेवा, विशेषतः आपत्कालीन विभाग व सर्जरी विभाग, योग्य प्रकारे कार्यरत नसल्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच रुग्णालयातील वॉर्ड व ओपीडी विभागात स्वच्छता व्यवस्थापन अत्यंत असमाधानकारक आहे", असं म्हणत आमदार सुनील कांबळे यांनी अधिवेशनात ससून रुग्णालयाच्या समस्यांचा पाढा वाचला आहे.

ससून रुग्णालयातील समस्यांवर माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया

त्यांच्या या समस्यांवर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, "ससून रुग्णालयात 2 हजार 350 पदे मंजूर असून त्यातील 789 पदे रिक्त आहेत. ससून रुग्णालया संदर्भात उपस्थित केलेल्या समस्या अगदी खऱ्या आहेत. तसेच पुढे ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रियेवर बोलताना मिसाळ म्हणाल्या की, परिचारकांची 160 पदे रिक्त असून चतुर्थ श्रेणीसाठी 50 टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या कामावर ताण येत आहे. चतुर्थश्रेणी कामगार पदे ‘टीसीएस’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाने भरण्याचे आदेश दिले असले तरी, ही भरती प्रक्रिया अद्याप झालेली नसून ती पुढील आठ दिवसात पूर्ण करण्यात येईल". तसेच स्वच्छतेच्या कामाची तपासणी करणार असल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Pune Bhausaheb Rangari Ganpati : ढोल-ताशांचा गजरात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान

CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : उद्धव ठाकरे नंतर मुख्यमंत्र्यांची शिवतीर्थावर उपस्थिती, नेमकं प्रकरण काय?

Manoj Jarange Azad Maidan : "माझ्या वडिलांना काय झाले तर त्याला..." जरांगेंच्या मुलीचा सरकारला इशारा