भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यावर गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रतापराव चिखलीकर, भाजपचे माजी आमदार देवराव होळी, माजी मंत्री व विद्यमान आमदार सुरेश खाडेंसह विविध नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.
तर आदित्य ठाकरे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षेत कुठलीही कपात नसल्याची माहिती मिळत आहे.