महाराष्ट्र शासनाने 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांवर हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आणखी एकदा वाढवली आहे. ती 15 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामध्ये आता एक वेगळाच घोळ याबाबतीत पाहायला मिळत आहे. ही HSRP पाटी बसवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर आधी नोंदणी करावी लागते. मात्र अधिकृत संकेतस्थळावर न जाता अनेक जण बोगस संकेतस्थळाला भेट देऊन त्याद्वारे नोंदणी करत आहेत. यामध्ये लोकांचे पैसे तर जातच आहेत पण HSRP प्लेट ही मिळत नाही .
राज्य सरकारकडून HSRP प्लेट संदर्भात स्पष्ट करण्यात आले आहे की, ही मुदत अंतिम असून त्यानंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. HSRP पाटी बसवण्यासाठी ही तिसऱ्यांदा मुदत वाढ केली आहे. त्यामुळे दुचाकीधारक आता याबाबत अधिक सक्रिय झाले असून, दंडात्मक कारवाई पासून वाचण्यासाठी अनेक जण HSRP प्लेट संदर्भात संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करत आहेत.
पण अनेक नागरिक अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर कोणत्या तरी बोगस संकेतस्थळावर नोंदणी करत आहेत. त्यामुळे लोकांना जास्तीचे पैसे ही यात भरावे लागत आहेत. याउलट नंबरप्लेट ही उपलब्ध करून दिली जात नाही. सध्या अश्या अनेक बोगस संकेतस्थळांवर HSRP प्लेट संदर्भात नोंदणी सुरु आहे. ज्यातून तुमची फसवणूक होऊ शकते. बनावट संकेतस्थळे HSRP नोंदणीच्या नावाखाली लोकांना लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
या बोगस संकेतस्थळाच्या जाळ्यातून बाहेर पाडण्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे अनिवार्य आहे. तुम्ही परिवहन विभागाच्या कार्यालयात किंवा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधू शकता. HSRP प्लेटसाठी महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://transport.maharashtra.gov.in हे असून या संकेतस्थळाला भेट देऊन आपली HSRP प्लेट संदर्भात नोंदणी येथे करावी.