मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची रंग टाकून विटंबना करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती. याचपार्श्वभूमिवर मोठी बातमी समोर आली आहे. मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान आरोपीने गुन्हा कबूल केल असून, आरोपीचा चुलत भाऊ हा उबाठाचा जुना कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.
तसेच श्रीधर पावसकर असे आरोपीच्या भावाचे नाव असून भावाभावातील संपत्तीच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य व उद्धव ठाकरे यांनी संपत्तीचा ताबा घेण्यात अडचणी निर्माण केल्याने हे कृत्य केल्याचा आरोपीने खुलासा केला आहे. दादर पोलिस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी तो सातत्याने यायचा. दरम्यान आरोपीविरोधात बीएनएस कलम 298 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे