थोडक्यात
बारावीच्या विद्यार्थ्यांना पूरपरिस्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य परीक्षा मंडळाने 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्यांनाही दिलासा
बारावीच्या (Maharashtra HSC Board Exam) विद्यार्थ्यांना राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे परीक्षांचे अर्ज भरण्यास अनेक अडचणी येतायत. त्यामुळे राज्य परीक्षा मंडळाने 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याचे सूचना दिल्या होत्या. ( Maharashtra HSC Board Exam Extension of time to fill exam application till 20th October)