ताज्या बातम्या

Scholarship Exam : चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा; शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलला

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवीऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवीऐवजी इयत्ता सातवीमध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

  • शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलला

  • शिष्यवृत्ती दरात सुधारणा

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवीऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवीऐवजी इयत्ता सातवीमध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

२०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे २०२५-२६ या शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन (अंतिमतः) साधारणतः फेब्रुवारी २०२६ च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी करण्यात येईल, तर एप्रिल किंवा मे २०२६ च्या कोणत्याही रविवारी इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः करण्यात येईल. २०२६-२७ पासून पुढे इयत्ता चौथी इयत्ता सातवी मध्ये नियमितपणे शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.

इयत्ता चौथीसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये तर इयत्ता सातवीसाठी प्रतिवर्षी सात हजार पाचशे रुपये शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.प्रत्येकी १६,६९३ आणि इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवी करिता इयत्ता चौथी व इयत्ता पाचवीकरिता प्रत्येकी १६,५८८ शिष्यवृत्ती संच मंजूर राहतील. त्याचप्रमाणे यापुढे पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नाव 'प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' (इ. चौथी स्तर) आणि 'उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' (इ. सातवी स्तर) असे करण्यात येणार आहे.

खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना १९५४-५५ पासून कार्यान्वित असून त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. त्यानुसार परीक्षेचे आयोजन करण्यात येते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा