Vakola Bridge : मुंबईतील वाहतूक कोंडीला दिलासा; वाकोला पूल नागरिकांसाठी लवकरच खुला Vakola Bridge : मुंबईतील वाहतूक कोंडीला दिलासा; वाकोला पूल नागरिकांसाठी लवकरच खुला
ताज्या बातम्या

Vakola Bridge : मुंबईतील वाहतूक कोंडीतून सुटका; वाकोला पूल नागरिकांसाठी लवकरच खुला

वाकोला पूल: मुंबईतील वाहतूक सुलभ; कुर्ला ते विमानतळ प्रवास सिग्नलशिवाय.

Published by : Team Lokshahi

The longest Cable Bridge In South Asia, Vakola : कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) वाकोला जंक्शनजवळ उभारलेला अत्याधुनिक आणि दक्षिण आशियातील सर्वात लांब वळणदार केबल आधारित पूल आता पूर्ण झाला असून लवकरच नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. हा पूल सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा असून, त्याच्या उभारणीमुळे कुर्ला ते विमानतळ हा प्रवास सिग्नलशिवाय आणि अडथळेविना शक्य होणार आहे. पूल वाकोला सिग्नलच्या वरून जात पानबाई इंटरनॅशनल स्कूलजवळ खाली येतो. परिणामी, कलिना परिसरातून पश्चिम द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

या उड्डाणपुलाची रचना खास आहे. तो सुमारे 25 मीटर उंचीवर असून, वाकोला जंक्शनजवळ 90 अंशाच्या तीव्र वळणावर 100 मीटर लांबीचा वळणदार भाग आहे. यासाठीच त्याची केबल आधारित रचना करण्यात आली आहे. पुलाच्या मुख्य भागात 215 मीटर लांबीचा स्टील डेक (ऑर्थोट्रॉपिक गिर्डर) बसवण्यात आला आहे. पुलाची एकूण रुंदी 10.5 ते 17.2 मीटर असून तो दुहेरी मार्गिकांसह बांधण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात 2016 मध्ये झाली होती आणि 2019 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज होता. मात्र कोविड महामारी आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे तो विलंबाने पूर्ण झाला. यामुळे प्रकल्प खर्चातही जवळपास 650 कोटी रुपयांची वाढ झाली. सध्या पुलावर अंतिम टप्प्याचे काम, सूचना फलक, रंगकाम, लाइटिंग आणि सौंदर्यीकरण सुरू आहे.

महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी नुकतीच या पुलाला भेट दिली. त्यांनी सांगितले की, "पूल लवकरच, पावसाळ्यातच नागरिकांच्या सेवेत येईल. हा पूल केवळ वाहतुकीसाठी उपयोगी नसून मुंबईच्या आधुनिक रचनेत एक नवा लँडमार्क ठरणार आहे." हा पूल केवळ मुंबईकरांसाठी नव्हे, तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठीही एक विशेष आकर्षण ठरणार आहे. कुर्ला ते विमानतळाचा प्रवास आता अधिक वेगवान, सुलभ आणि सिग्नलफ्री होणार आहे.

हेही वाचा...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी