Republic Day 2026 Chief guest selection process in marathi 
ताज्या बातम्या

Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनासाठी येणाऱ्या प्रमुख पाहुण्याची निवड प्रक्रिया काय? यंदा कोणाला मिळला मान जाणून घ्या...

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनासाठी यंदाचे प्रमुख पाहुणे निश्चित झाले आहेत. यावेळी युरोपियन युनियनचे दोन सर्वोच्च नेते भारताच्या पाहुणचाराचा मान मिळवणार आहेत.

Published by : Riddhi Vanne

Republic Day 2026 Chief Guest Selection Process : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनासाठी यंदाचे प्रमुख पाहुणे निश्चित झाले आहेत. यावेळी युरोपियन युनियनचे दोन सर्वोच्च नेते भारताच्या पाहुणचाराचा मान मिळवणार आहेत. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयेन हे 26 जानेवारीच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

हे दोन्ही नेते 25 ते 27 जानेवारी 2026 दरम्यान भारत दौऱ्यावर येणार असून, या काळात भारत–EU शिखर परिषदेसह विविध महत्त्वाच्या बैठका होतील. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहणार आहेत.

भारत आणि युरोपियन युनियनमधील वाढते राजकीय, आर्थिक आणि धोरणात्मक संबंध लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. 1950 पासून परदेशी मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण देण्याची परंपरा सुरू असून, हा सन्मान आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष मानाचा समजला जातो.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांना खास सन्मान, तोफांची सलामी, राष्ट्रपती भवनात स्वागत आणि राजघाटावर आदरांजली अर्पण करण्याची परंपरा पाळली जाते. यंदाचा सोहळा भारत–युरोप संबंधांसाठी नवे पर्व ठरू शकतो.

थोडक्यात

  1. भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे निश्चित

  2. यंदा युरोपियन युनियनचे दोन सर्वोच्च नेते प्रमुख पाहुणे

  3. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा उपस्थित राहणार

  4. युरोपियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयेन यांचा सहभाग

  5. २६ जानेवारीच्या मुख्य सोहळ्यात दोघांची उपस्थिती

  6. भारत–युरोपियन युनियन संबंधांना नवे बळ मिळण्याची शक्यता

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा