Republic Day 2026 : देशभरात 77 व्या प्रजासत्ताक दिनासाठी उत्साहात तयारी सुरू आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले आणि भारताने लोकशाही गणराज्य म्हणून नवा प्रवास सुरू केला. याच ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
यंदाचा सोहळा खास ठरणार असून नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर भव्य परेड होणार आहे. या परेडमधून भारताची संस्कृती, लष्करी सामर्थ्य, विज्ञानातील प्रगती आणि आत्मनिर्भर भारताची झलक पाहायला मिळेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सकाळी 9.30 वाजता परेड सुरू होईल, तर नागरिकांसाठी प्रवेशद्वार 7.30 वाजता खुले राहतील.
यावेळी भारतीय हवाई दल आकाशात थरारक कसरती सादर करणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ या संकल्पनेवर आधारित हवाई प्रदर्शनात राफेल, सुखोई-30 , मिग-29 आणि जॅग्वार ही आधुनिक लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनातून भारताच्या हवाई दलाची ताकद आणि तंत्रज्ञान जगासमोर मांडले जाणार आहे. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
थोडक्यात
देशभरात 77 व्या प्रजासत्ताक दिनासाठी उत्साहात तयारी सुरू आहे.
२६ जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले.
याच दिवशी भारताने लोकशाही गणराज्य म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात केली.
या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.