Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की,... Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की,...
ताज्या बातम्या

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

रेशम टिपणीस: मुलाचा फोटो वापरल्याने संताप, अभिनेत्रीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.

Published by : Team Lokshahi

Resham Tipanis is Angry Because The Child's Photo Was Posted : कांदिवलीच्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध गुजराती अभिनेत्रींच्या मुलाने 57व्या मजल्यावरून उडी घेत स्वतःचे जीवन संपवले. अवघ्या 14 वर्षाच्या या मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकुलता एक मुलाने आपला जीव गमावल्यामुळे अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, मात्र या घटनेमुळे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस हिला मोठा त्रास सहन करावा लागला. कालच्या बातमीबद्दल एका वेबसाईटने गुजराती अभिनेत्रींच्या मुलाची माहिती देताना रेशम टिपणीसच्या मुलाचा फोटो लावल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे रेशम टिपणीसने संताप व्यक्त केला असून हे कृत्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यार असल्याचंही तिने सांगितले आहे.

कांदिवली परिसरात 'सी ब्रूक' इमारतीमध्ये प्रसिद्ध गुजराती मालिकेची अभिनेत्रीने संध्याकाळच्या वेळेस त्या अभिनेत्रीने आपल्या मुलाला ट्युशन क्लासला जाण्यास सांगितले. त्या मुलाने ट्युशनला जाण्यास नकार दिला. यामुळे दोघांमध्ये भांडण होऊन हा राग मनाशी धरून 14 वर्षाच्या मुलाने मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्याच्या राहत्या घरातुन तब्बल 57व्या मजल्यावरून उडी मारत त्याने त्याचे जीवन संपवले.

या घटनेची माहिती प्रसिद्ध करताना एका वेब पोर्टलने या बातमीसोबत चुकून रेशम टिपणीस आणि तिच्या मुलाचा फोटो पोस्ट केला. ही पोस्ट वायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. जेव्हा ह्या पोस्टमुळे रेशमला फोन येऊ लागले तेव्हा तिला हा सगळा प्रकार समजला. याबाबत रेशमने संताप व्यक्त करत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली.माझा मुलगा बाप्पांच्या आशीर्वादाने अगदी व्यवस्थित असून आमच्या विरुद्ध खोटी बातमी पसरवली जात आहे. आणि ज्याने हे वाईट कृत्य केले आहे त्याच्याविरुद्द तक्रार करणार आहे. अश्या आशयाची पोस्ट तिने टाकली. दरम्यान रेशमचा मुलगा मानव हा रेशम आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव सेठ यांचा मुलगा आहे.

हेही वाचा...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा