Admin
Admin
ताज्या बातम्या

रुग्णाचा डॉक्टरवर चाकूहल्ला; राज्यातील निवासी डॉक्टरांचा पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर 2 जानेवारीपासून संपावर जाण्याचा राज्य सरकारला इशारा दिला होता. सेन्ट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देत याबाबत माहिती देण्यात आली होती. दरम्यान गिरीश महाजन यांनी याबाबत बैठक घेत लवकरच यावर मार्ग काढण्याची ग्वाही दिली. यावरून राज्यातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला होता. यवतमाळमध्ये एका रुग्णाने डॉक्टरवर चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे संतापलेल्या डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला आहे.

या हल्ल्यामध्ये हा निवासी डॉक्टर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या गालाच्या खालच्या बाजूला जखम झाली असून बराच रक्तस्राव झाला आहे. वारंवार रुग्णांकडून असे हल्ले होत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. आज या विरोधात राज्यातील सगळे निवासी डॉक्टर हाताला काळी फीत बंधून त्याचा निषेध नोंदवणार आहेत. 

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...

Naseem Khan: नसीम खान यांचा प्रचार समितीचा राजीनामा मागे

Beed: बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त