ताज्या बातम्या

जम्मू-काश्मीर विधानसभेत मोठा राडा; 370 कलम लागू करण्याच्या ठरावाला मंजुरी

जम्मू-काश्मीर विधानसभेत मोठा राडा; पुन्हा 370 कलम लागू करण्याचा ठराव. भाजप आमदारांचा विरोध असतानाही सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आमदारांनी ठरावाला पाठिंबा दिला.

Published by : shweta walge

थोडक्यात

  • जम्मू काश्मीरच्या नव्या विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

  • या ठरावाला सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आमदारांनी पाठिंबा दर्शवला, तसेच मुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी विरोध असूनही हा ठराव मांडला.

  • भाजपने अब्दुल्ला कुटुंब आणि नॅशनल कॉन्फरन्सवर आरोप केला आहे की, लोकांना भावनिक ब्लॅकमेल करण्यासाठी हा ठराव मंजूर करण्यात आला.

जम्मू काश्मीरच्या नव्या विधानसभेत पुन्हा ३७० कलम लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. भाजप आमदारांचा विरोधात असतानाही पमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी हा ठराव माडंला आहे. या ठरावाला सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आमदारांनी पाठिंबा दर्शवल्याने ठराव मंजूर करण्यात आला.अब्दुल्ला परिवार आणि नॅशनल कॉन्फरन्सने लोकांना भावनिक ब्लॅकमेल करण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप भाजपचा आहे.

केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेत राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले होते. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. ११ डिसेंबर २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने केंद्राचा निर्णय कायम ठेवला होता. आता मोदी सरकारने हटवलेले ३७० कलम पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न विद्यमान राज्य सरकारकडून सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rahul Gandhi : चंद्रपूरच्या राजुऱ्यातही मतचोरी? राहूल गांधींचा दावा, भाजपाने फेटाळला आरोप

Asia Cup 2025 PAK vs UAE : आधी पाकिस्तान-यूएई सामना चर्चेत, नंतर सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू आला चर्चेत; थेट अम्पायरलाच चेंडू मारला

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठा विजय, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका फेटाळली

Smart Sunbai : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित