राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता पुन्हा नोकरीवर रुजू होता येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने बुधवारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही घोषणा केली असून, यामध्ये कर्मचाऱ्यांना एक ते तीन वर्षांसाठी काम करता येणार आहे. ही सवलत एकूण पदसंख्येच्या 10 टक्के होणार असून ती कंत्राटी स्वरुपात होणार आहे. या सवलतीसाठी कमाल 65 वर्षांपर्यंत कंत्राटी स्वरुपात काम करता येणार आहे.