Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे" ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची ट्विट करत प्रतिक्रिया  Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे"
ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

चंद्रशेखर बावनकुळे: ‘म’ म्हणजे ‘महापालिका’, मराठी नाही; ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यानंतर ट्विटद्वारे टीका.

Published by : Riddhi Vanne

Revenue Minister Chandrashekhar Bawankule's tweet reaction after the Vijayi Melava : महाराष्ट्राच्या इतिहासात आज मराठी विजयानिमित्त ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमात दोन्ही ठाकरेबंधू एकत्र मराठी भाषेसाठी लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया ट्विट करत दिली आहेत. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयी मेळाव्यावरुन टीका केलीये. उद्धव ठाकरेंचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका असल्याचं त्यांनी म्हटलंय.

काय लिहिलय बावनकुळे यांनी एक्स पोस्टमध्ये?

मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाहीतर ती धोरणात दिसली पाहिजे. पण तुम्ही मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं. आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे! यांचं मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की आठवण येणारी राजकीय नौटंकी आहे. जनतेनं आता हा दुटप्पीपणा ओळखला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद