पुण्यात रॅपिडो बाईक-टॅक्सीविरोधात रिक्षा चालकांनी आज आंदोलन पुकारल आहे. संगम ब्रिज येथील आरटीओ कार्यालयासमोर मोठ्या संख्येने रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनेक रिक्षा चालकांनी आपली रिक्षा ही रस्त्यावरच सोडून दिली आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे रिक्षा चालक आक्रमक झाल्यानंतर आता पोलीस ही अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत.
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी आंदोलकांना विनंती केली होती. पण रिक्षा चालकांनी पोलिसांचं ऐकलं नाही मात्र, त्यानंतर पोलीस हे स्वतः रिक्षा रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम करत आहेत. या आंदोलनाला आता वेगळं स्वरुप मिळताना दिसतंय. रिक्षाचालक आपल्या रिक्षा आंदोलनस्थळी सोडून तिथून निघून गेले आहेत. खरंतर ते जाणार नव्हते. पण जवळपास 200 पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने घडामोडींना वेग आला.