आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु ही तिच्या अभिनयाने घराघरांत पोहचली आहे. रिंकू ही सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच आता रिंकू वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
कोल्हापुरातील भाजपचे नेते धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये कृष्णराज महाडिक यांच्यासोबत रिंकू राजगुरू दिसत होती. हा फोटो शेअर करत कृष्णराज महाडिक यांनी लिहिलं होते की, "आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.
या फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर अनेक वेगवेगळ्या कमेंट्स आल्या. या फोटोची जोरदार चर्चा चालू असतानाच रिंकू राजगुरूने इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला. यामध्ये कृष्णराज महाडिक यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रिंकूने जो ड्रेस परिधान केला होता तोच ड्रेस आहे. हा फोटो शेअर करत तिने या फोटोला 'अपने ही रंग मे मुझको रंग दे' असे गाणे जोडले आहे. या फोटोमुळे आता चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.