महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि महापराक्रमी यौद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत 'राजा शिवाजी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी नुकतेच चित्रपटाचे टिझर सोशल मीडियावर शेअर केले असून प्रेक्षकांना या चित्रपटाची रिलिज डेट जाहीर केली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2026 ला 1 मे (महाराष्ट्र दिन) रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख यांनी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून त्यांची या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. चित्रपटात भलीमोठी स्टारकास्ट असून चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या सहा भाषांमध्ये प्रदर्शिक केला जाणार आहे.
रितेश देशमुखसह संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख या कलाकारांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनी यांची निर्मिती आहे.