पुण्यात चक्क खेळण्याची बंदूक दाखवत तीन चोरांनी सराफाच्या दुकानातील सोनं लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड परिसरात भरदिवसा ही घटना घडली आहे. त्या चोरांनी तब्बल २५ ते ३० तोळे सोनं लुटलं आहे. त्यांची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्या तिघांनी तोंडाला रुमाल बांधले असून त्यांच्या हातात बॅग असल्याचे पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ दुकानात जाताना आणि बाहेर पडतानाचा असून हे तिघेही बाईकवर बसून पळून गेल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे चक्क खेळण्याच्या बंदुकीची भीती दाखवत या चोरांनी लाखोंचे सोने लुटले आहे.