ताज्या बातम्या

Sanjay Shirsat : लड्डा बंगल्यातील धाडसी दरोड्यात 10 किलो सोने चोरीचा संजय शिरसाट यांना संशय

संजय शिरसाट: लड्डा बंगल्यातील दरोड्यात 10 किलो सोने चोरीचा गंभीर दावा, तपासात गतीची गरज.

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगर शहराच्या उच्चभ्रू वसाहतीत घडलेल्या लड्डा बंगल्यावरील दरोड्याने आधीच खळबळ उडवून दिली असतानाच, आता या प्रकरणात नवा आणि गंभीर ट्विस्ट समोर आला आहे. सुरुवातीला सांगितलेल्या ५.५ किलो सोन्याच्या चोरीच्या आकड्याला छेद देत, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी "चोरीला गेलेल्या सोन्याचे प्रमाण हे १० किलोपर्यंत असू शकते," असा गंभीर दावा गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, “आज अखेर केवळ ३२ तोळे सोनं पोलिसांच्या ताब्यात आले असून, उर्वरित मुद्देमालाचा तपास अद्याप प्रलंबित आहे. वास्तविक चोरी किती झाली, हे स्पष्ट होण्यासाठी सखोल तपास गरजेचा आहे.” या संपूर्ण प्रकरणात पोलिस तपासाच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित करण्यात आली आहे. "इतक्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल अद्याप सापडलेला नाही, हे चिंताजनक असून, तपासात गती आणणे अत्यावश्यक आहे," असे मंत्री शिरसाट यांनी ठामपणे स्पष्ट केले.

एन्काउंटरवरही प्रश्न; गुन्हेगारांचे कनेक्शन उघडकीस येण्याची शक्यता

दरोड्याच्या घटनेनंतर घडलेल्या पोलिस एन्काउंटरप्रकरणीही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत आरोपीवर १० गुन्हे होते, तर दुसऱ्या आरोपीवर अंबाजोगाईत गुन्हे दाखल असल्याची माहिती यावेळी उघड झाली. या संदर्भात शिरसाट म्हणाले, “ही गाडी अंगावर घालण्याची पहिली घटना नव्हती. पोलिसांनी केवळ बचावासाठीच कारवाई केली. मात्र, यामागे कोणतेही अपारदर्शक निर्णय किंवा दबाव होते का, याची चौकशीही आवश्यक आहे.”

पोलिस आयुक्तांसोबतच्या भेटीनंतर मंत्री शिरसाटांनी दिलेल्या माहितीनुसार, “पोलिस आता अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये असून, लवकरच आणखी आरोपी अटकेत येतील. पोलिस दलातील कुणाचा सहभाग या प्रकरणात आढळल्यास, त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. या वक्तव्यामुळे यंत्रणेतील संभाव्य सांठगाठ आणि त्यावरील कारवाईकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

मामुली चोरी की व्यापक षड्यंत्र?

लड्डा बंगल्यातील चोरी आता केवळ एका गुन्हेगारी घटनेपुरती सीमित राहिलेली नाही. या मागे मोठे आर्थिक गैरव्यवहार, हितसंबंधांचे जाळे आणि संस्थात्मक लपवाछपवी असण्याची शक्यता अधिकच बलवत्तर होत आहे. सोन्याचे मूळ प्रमाण, त्याचे व्यवहारातील संदर्भ, आणि गुन्हेगारांचे नेटवर्क – या सगळ्यांची सखोल चौकशी केल्याशिवाय हे प्रकरण पूर्णत्वास जाणे अशक्य आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."