राज्यात हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. 5 जुलै रोजी मुंबईत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.
याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते सुनिल तटकरे यांनी सांगितलं होत की, राष्ट्रवादी अजित पवार गटाचं कोणीही या मोर्च्यात सहभागी होणार नाही, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी सक्तीला विरोध केल्याच पाहायला मिळाल.
दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून ठाकरेंच्या या मोर्च्याला पाठिंबा असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होत. यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी लोकशाही मराठीला भेट देत त्यांनी भूमिका मांडली आहे. याचपार्श्वभूमीवर रोहिणी खडसे हिंदी सक्तीविरोधात काढल्या जाणाऱ्या मोर्च्याबाबत काय म्हणाल्या जाणून घ्या.