मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओत साधारण 17 मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्या या व्यक्तीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करतान पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. यातच त्याचा मृत्यू झाला. रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली होती. मुलांची सुटका केल्यानंतर रोहित आर्या याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रोहित आर्याचे एन्काऊंटर करण्यात आल्याचे समोर आले आहे.