ताज्या बातम्या

Nitin Sapute On Rohit Arya Case : रोहित आर्यांचे एन्काऊंटर पोलिसांना भोवणार! नितीन सातपुतेंची हायकोर्टात धडक

पवईमधील रोहित आर्यांचे एन्काऊंटर पोलिसांना भोवण्याची शक्यता आहे. अ‍ॅडवकेट नितीन सातपुते यांची उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली असून एन्काउंटर फेक असल्याचा सातपुतेंचा दावा आहे.

Published by : Prachi Nate

मुंबईतल्या गजबजलेल्या पवई परिसरामध्ये रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं आपल्या प्रलंबित मागण्या महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण होत नसल्याच्या कारणावरून काही मुलांना ओलीस धरण्याचा थरारक घटनाक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याननंतर पवईमध्ये ऑडिशनला बोलावून 17 मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्य या व्यक्तीचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला.

दरम्यान या एन्काऊंटरप्रकरणी आता अनेक खुलासे समोर येत असताना पोलिसांच्या कारवाईवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याप्रकरणी अ‍ॅडवकेट नितीन सातपुते यापुर्वीही असं म्हटलं होत की, "ही बनावट चकमक आहे, निरपराध मुलांचे रक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्च दबावामुळे राज्य पोलिस यंत्रणेचे अपयश लपविण्यासाठीच चकमक घडवण्यात आली".

त्यानंतर आता पवईमधील रोहित आर्यांचे एन्काऊंटर पोलिसांना भोवणार? असल्याचे चित्र समोर येत आहे. अ‍ॅडवकेट नितीन सातपुते यांचा दावा आहे की, रोहित आर्याचे पवई पोलिसांनी केलेलं एन्काऊंटर हे फेक एन्काऊंटर आहे. अ‍ॅडवकेट नितीन सातपुते यांची उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारीत अ‍ॅडवकेट नितीन सातपुते यांनी म्हणाल आहे की, याप्रकरणी कोर्टाने सुमोटो अंतर्गत स्वतः दाखल घ्यावी. तसेच कोर्टाने दखल न घेतल्यास जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारा देखील अ‍ॅडवकेट नितीन सातपुते यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा