ताज्या बातम्या

Rohit Pawar : ज्या ज्या गोष्टी लोकशाहीमध्ये बसत नाही त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करुन दाखवल्या, तरीसुद्धा लोकांनी लोकशाहीला निवडलं

राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकरी प्रश्नांसह विविध मुद्द्यांवरुन शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं घरं, कुटुंब फोडली, पैशाचा वापर केला, गुंडांचा वापर केला, दडपशाहीचा वापर केला. अनेक लोकांना भिती दाखवली. ज्या ज्या गोष्टी लोकशाहीमध्ये बसत नाही त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करुन दाखवल्या. तरीसुद्धा लोकांनी लोकशाहीला निवडलं. ही सगळ्यात महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे.

यासोबतच ते म्हणाले की, या बजेटमध्ये आपण जर बघितलं. कुठेतरी भाजप आणि भाजपाचे मित्रपक्ष घाबरलेत हे आपल्याला बघावं लागेल आणि ते दिसतंय. कारण की, अजितदादा बोलत असताना दहाव्यांदा ते बजेट सादर करत होते आणि गेल्या दहावेळेस त्यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये जो प्रमुख विषय होता शेतीच्या पाण्याचा तो त्यांनी वगळला होता. पहिल्यांदा त्यांनी तो घेतला. लोकांना बऱ्याच योजना पोहचल्यात नाहीच. लोकांना माहित नाही आहे सरकारने आपल्या हितासाठी काय केलं. त्यामुळे आता यांना पोस्टर लावण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहिला नाही. लोक यांना नाकारतील आणि महाविकास आघाडीला बहुमत देतील. असे रोहित पवार म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा