ताज्या बातम्या

Rohit Pawar : व्यक्ती महागडा असला की सिस्टीम कशी झुकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंत्रालयातील काळी गाडी

मंत्रालयात एक अलिशान लॅम्बोर्गिनी कार आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.

Published by : Siddhi Naringrekar

मंत्रालयात एक अलिशान लॅम्बोर्गिनी कार आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. चर्चा सुरु झाल्या. राजकीय वर्तुळात यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत म्हणाले की, व्यक्ती महागडा असला की सिस्टीम कशी झुकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंत्रालयातील काळी गाडी. या काळ्या गाडीच्या मालकाचे नाव आहे कुमार मोरदानी. या व्यक्तीविषयी कुठ्लाही राजकारणी किंवा अधिकारी बोलणार नाही, मिडिया देखील बोलणार नाही कारण हा व्यक्ती सर्वांची काळजी घेतो. या व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या नावे ५० हून अधिक कंपन्या ministry of corporate affairs कडे नोंद असून या महागड्या व्यक्तीने अनेक बँकांना कोट्यवधींचा चुना लावला आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने या व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता. त्यामध्ये ग्राहकांनी ज्या प्रकल्पासाठी १९ कोटी दिले, बँकांनी ज्या प्रकल्पासाठी २०२ कोटीचे कर्ज दिले ते पैसे त्या प्रकल्पासाठी न वापरता २२१ कोटीपैकी १९६ कोटी दुसरीकडेच वळवले, शिवाय प्रकल्पाला ६ मजल्यांची परवानगी असताना १३ मजले बांधले आणि रेरा कायद्याचंही उल्लंघन केलं.एका दुसऱ्या प्रकरणात तर SRA कायद्याअंतर्गत वाढीव FSI घेतला परंतु SRA ची कामे न करता शासनाची फसवणूक केली. त्यासंदर्भात तर २०१७ मध्ये तत्कालीन विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला. शासनानेही फसवणूक झाल्याचे मान्य केले, ज्या सदस्यांनी हा मुद्दा मांडला त्यापैकी ना. धनंजय मुंडे साहेब आणि ना. नितेश जी राणे हे सदस्य सध्या मंत्रिमंडळात आहेत.

ही महागडी गाडी मंत्रालयात आली तर मंत्रालयात त्यांचं कामही तेवढंच महागडं असेल. पनवेल येथे रोडलगत ११६ एकर जमीन जी जमीन पूर्वी शासनाची भोगवटा – वर्ग २ मध्ये होती, त्यासंदर्भातली फाईल क्लिअर करण्यासाठी एका मंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पनवेलमध्ये ११६ एकर रोडलगत जमीन म्हणजे ७०० कोटीहून अधिकच महागडा विषय आहे आणि देवाणघेवाणही महागच असेल, यात कुठलीही शंका नाही .एरवी सर्वसामान्य जनतेची नाकाबंदी करणाऱ्या मंत्रालयीन व्यवस्थेने या महागड्या गाडीला विशेषतः ज्या गाडीचा मालक शासनाची फसवणूक करण्याच्या अनेक गुन्ह्यात गुन्हेगार आहे अशा गुन्हेगाराला सर्व नियम धाब्यावर बसवून कुठलीही चौकशी न करता थेट आत सोडलेच कसे? हा प्रश्न आहे, पण ही गाडी सोडण्यासाठी एका उपमुख्यमंत्री कार्यालातून फोन आल्याचे सांगितले जात आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, बीड-परभणी घटनेत आरोपी कोण? आरोपीच्या जवळचे कोण? तपास कसा होतोय? हे राज्यातल्या शेंबड्या पोरालाही माहित आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही माहित आहे. छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारा आपटे जसा काल परव्याअभावी सुटला तसेच बीड-परभणी घटनेतील आरोपी देखील सुटतील. दोषींवर कारवाई होणार नाही हिच भीती अधिक आहे. कारण आरोपी धनदांडगे आहेत तर पिडीत सर्वसामान्य आहेत. मंत्रालयातल्या महागड्या गाडी प्रकरणातही ती व्यक्ती कोणत्या कामासाठी आली? कुणाला भेटली? हे सर्वांनाच माहित आहे पण कुणी बोलणार नाही कारण ती व्यक्ती धनदांडगी आणि सत्तेशी संबंधीत आहे. एकीकडे देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभर मोर्चे निघत आहेत पण त्यांची दखल शासन घेत नाही, परंतु दुसरीकडे महागड्या गाडीच्या महागड्या मालकाचे बेकायदेशीर काम करून देण्यासाठी मंत्रालयात पायघड्या अंथरल्या जातात, हे आपल्या कायदा सुव्यवस्थेचं भीषण वास्तव आहे. असे रोहित पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Kenekar : खुलताबादचं नाव 'रत्नापूर' करण्याची मागणी ; भाजप आमदार संजय केणेकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Pravin Gaikwad : चंद्रशेखर बावनकुळे दीपक काटेचे गॉडफादर असल्याचा आरोप

Latest Marathi News Update live : आजपासून होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया