ताज्या बातम्या

Rohit Pawar : 'हे#2024 वर्षा, तुला आम्ही कधीही माफ करणार नाही कारण...'

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन.

Published by : Siddhi Naringrekar

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारावेळी त्यांचे निधन झालं.

याच पार्श्वभूमीवर रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, हे#2024 वर्षा, तुला आम्ही कधीही माफ करणार नाही. कारण जाताना तू एकटा जात नाहीस तर आमच्या भारताचे महान रत्न तू चोरून घेऊन चाललास! आमच्या याच रत्नांनी खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला झळाळी दिली, अर्थव्यवस्थेला दिशा दिली, व्यवसायाला सामाजिक जाणीवेची झालर दिली. या दोघांनाही भारतवर्षातील प्रत्येकाने आपल्या हृदयात आदराचं आणि सन्मानाचं स्थान दिलं, त्यांच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव केला, देशप्रेमाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून आम्ही त्यांचं नाव अभिमानाने ओठावर मिरवलं.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, प्रसिध्दीपासून दूर राहून ते फक्त काम करत राहिले. त्यांच्या प्रत्येक श्वासात केवळ देश आणि देशहित होतं. ते इतके मोठे होते की देश त्यांचं योगदान कधीही विसरणार नाही.. अशा आमच्या कोहिनूर हिऱ्यांना तू चोरून घेऊन चाललास. म्हणून 2024 वर्षा तुला आम्ही कदापि माफ करणार नाही. असे रोहित पवार म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा