ताज्या बातम्या

Rohit Pawar Tweet | 'गुजराती EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही?' रोहित पवार यांचा सवाल

रोहित पवार यांनी ट्विटद्वारे विचारलेल्या सवालांमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह; नाशिक जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची मतं जवळपास सारखीच?

Published by : shweta walge

विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. या निवडणुकीत महायुतीने २३७ जागा जिंकत मविचा सुपडा साप केला. मात्र भाजपाची राज्यात लाट आली. एकट्या भाजपाच्या पारड्यात 132 जागा पडल्या. तर महायुतीने 233 जागांची घसघशीत कमाई केली. पण अनेक ठिकाणी मतांची बेरीज नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महायुती जनतेच्या मतांवर नाही तर ईव्हीएमच्या मतावर निवडून आल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला आहे. यावरुनच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रोहित पवार यांनी वेगळीच शंका व्यक्त करत एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये पवारांनी विजयी उमेदवारांची आकडेवारी मांडत गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? असा खडा सवाल केलाय.

नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो. निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं - काय खोटं हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत. तरी आयोग जनभावना लक्षात घेऊन लवकरच स्पष्टीकरण देईल, ही अपेक्षा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांनी ट्विट केलेल्या आकडेवारीमध्ये नाशिक जिल्ह्यामधील १२ आमदारांची नावे आणि त्यांना झालेल्या मतदानाची आकडेवारी सांगितल आहे. यामध्ये माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, छगन भुजबळ, हिरामण खोसकर, नितीन पवार, दिलीप बनकर, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, देवयानी फरांदे आणि डॉ.राहुल आहेर यांची नावं आहेत. रोहित पवारांच्या आरोपाला महायुतीकडून काय उत्तर देण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा