ताज्या बातम्या

Rohit Pawar Twit : "गुन्हेगारांना-नेत्यांना जमीन सरकारची नवी योजना" पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावर रोहित पवारांची सरकारवर झोड

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गाजत आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Prachi Nate

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक घोटाळ्यावरून खळबळ उडाली आहे.. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गाजत आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी घेतलेल्या जमिनीची बातमी राजकीय वादळ उठले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिन खरेदी प्रकरणात अनियमित्ता झाल्याचा आरोप झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात पार्थ पवारांचे व्यावसायिक भागीदार आणि मामाचा मुलगा दिग्विजय पाटील यांचे नाव देखील चर्चेत आले.

या प्रकरणामुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं असून यावर अनेक विरोधीपक्ष नेत्यांकडून याप्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवारांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे?

गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन” सरकारची नवी योजना

नवी मुंबईत शिंदे साहेबांचा गट – ५००० कोटीची सिडको जमीन

पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा –१८०० कोटीची जैन बोर्डिंग जमीन

पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा- ५०० कोटीची मोबोज हॉटेल कंपाऊंड इव्याकु प्रॉपर्टी ची जमीन

संभाजीनगरमध्ये शिंदे साहेबांचा गट – #MIDC ची राखीव जमीन

संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भाजपा –२०० कोटीची अंजली टॉकीजची जमीन

पुण्यात अजित दादांचा गट –३०० कोटीची कोरेगाव पार्क जमीन

अहिल्यानगरमध्ये अजित दादांचा गट – जैन समाजाची जमीन

नवी मुंबई विमानतळाजवळ अवैध गौण खनिज उत्खनन घोटाळा - ३००० कोटी

मुंबईत देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा – SRA च्या हजारो कोटींच्या जमिनी

नाशिकमध्ये शिंदे साहेबांचा गट -

त्र्यंबकेश्वर जमीन

मुंबईत देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा – भाजपा कार्यालयाची जमीन

हे सर्व घोटाळे बघता शिवसेना शिंदे गट , भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कायदे - नियमांना धाब्यावर बसवून जमिनी लाटणारी “गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन” अशी नवी योजना सरकारमार्फत सुरू केलीय असेच म्हणावे लागेल. “करून वोटचोरी- करू जमिनीची लुटमारी” असे नवे ब्रीदवाक्य सरकारने ठेवायला हरकत नाही.

भाजपशी संबंधित प्रकरणे आली की चौकशी आधीच क्लीन-चीट द्यायची आणि इतर दोन मित्रपक्षांची प्रकरणे असली की पॉलिटिकल स्कोर सेटल होईपर्यंत आणि पॉलिटिकल बार्गेनिंग होईपर्यंत चौकशीचा बनाव करायचा अशा प्रकाराची ‘आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे ते कार्ट’ ही भाजपची कार्यपद्धती दिसून येते.

परिणामी महाराष्ट्रात हे जे सर्व काही घोळ सुरू आहेत त्यासाठी सरकारचे प्रमुख म्हणून प्रामुख्याने मुख्यमंत्री जबाबदार असून आणि त्यांनी या सर्व घोळांची जबाबदारी घ्यावी. असो, मुख्यमंत्री या सर्वच प्रकरणांची कुठलाही भेदभाव न करता पारदर्शकपणे चौकशी करतील का? हे बघणं महत्वाचं ठरेल!

@Dev_Fadnavis

#गुन्हेगारांना_जामीन_नेत्यांना_जमीन

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा