Rohit Sharma Viral Video 
ताज्या बातम्या

"वर्ल्डकप खेळायचंय...", दिनेश कार्तिकची धडाकेबाज फलंदाजी पाहून रोहित शर्माही झाला इम्प्रेस; VIDEO होतोय व्हायरल

दिनेश कार्तिकच्या फलंदाजीची स्टाईल पाहून रोहित शर्माही इम्प्रेस झाल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

Published by : Naresh Shende

Rohit Sharma Viral Video : मुंबई इंडियन्सने गुरुवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा दारुण पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. परंतु, दिनेश कार्तिकच्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली. कार्तिकने २३ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. आक्रमक फलंदाजी करून दिनेश कार्तिकने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. कार्तिकच्या फलंदाजीची स्टाईल पाहून रोहित शर्माही इम्प्रेस झाल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

कार्तिकची फलंदाजी पाहून रोहितने मैदानात ज्या प्रकारे रिअॅक्शन दिली, ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कार्तिक फलंदाजी करत असताना रोहित शर्मा स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. कार्तिकच्या धमाकेदार फलंदाजीला पाहून रोहित त्याच्याजवळ गेला. त्यावेळी रोहितने कार्तिकला वर्ल्डकप खेळण्याबाबत विचारलं. पण रोहितचा आवाज स्टंम्प माईकमध्ये कैद झाला.

रोहित म्हणाला, वर्ल्डकप निवडीसाठी पुश करायचं आहे, डोक्यात तर हेच चालू आहे. वर्ल्डकप खेळायचंय, वर्ल्डकप. रोहित हे सर्व बोलत असताना त्याच्याजवळ ईशान किशनही होता. ईशानच्या रिअॅक्शनही चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, कार्तिकच्या ५३ धावांच्या जोरावर आरसीबीला १९६ धावांपर्यंत मजल मारता आली. कार्तिकने ५ चौकार आणि ४ षटकार ठोकून ५३ धावा केल्या. परंतु, दिनेश कार्तिकची खेळी व्यर्थ ठरली. कारण मुंबईने ७ विकेट्स राखून या सामन्यात आरसीबीचा पराभव केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Local Bodies Election Supreme Court : स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत मोठा निर्णय, पुढच्या वर्षी होणार निवडणुक प्रक्रिया; तारीख जाहीर

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Empty Stomach Eating : रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? वाचल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल...

Vanatara News : वनताराला मिळाली क्लीन चिट! 'त्या' आरोपावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय