Rohit Sharma And Hardik Pandya Viral Video 
ताज्या बातम्या

गुजरातनं मुंबईचा पराभव केल्यानंतर रोहितनं हार्दिकला दिला मोठा सल्ला, VIDEO होतोय व्हायरल

रोहित आणि हार्दिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Published by : Naresh Shende

गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी पराभव करून आयपीएलमधील पहिल्या विजयाला गवसणी घातली. हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं. परंतु, कालच्या सामन्यात हार्दिकला यश मिळालं नाही. गुजरातने पराभव केल्यानंतर रोहित शर्माने हार्दिकची मैदानावरच शाळा घेतली. रोहित आणि हार्दिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, सामना संपल्यानंतर रोहित आणि हार्दिक मैदानातच एकमेकांशी चर्चा करत होते. रोहत हार्दिकला महत्त्वाच्या गोष्टींबद्दल समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तसंच मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी त्यांच्याजवळ उभे असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातने २० षटकांत १६८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सने या धावांचा पाठलाग करत २० षटकात १६२ धावा केल्या. त्यामुळे या सामन्यात मुंबईचा ६ धावांनी पराभव झाला. गुजरातच्या संघाकडून साई सुदर्शनला प्लेयर ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करण्यात आलं.

हार्दिकवर होतेय टीका

या सामन्यात हार्दिक पंड्याने मुंबईसाठी गोलंदाजीची सुरुवात केली. हार्दिकच्या या निर्णयामुळे अनेक दिग्गजांना धक्का बसल्याचं बोललं जात आहे. केविन पीटरसनने याबाबत ट्वीट करुन हार्दिकवर टीका केलीय. बुमराहला पहिलं षटक का नाही दिलं? असा सवाल पीटरसनने उपस्थित केला आहे. हार्दिकने या सामन्यात तीन षटकांची गोलंदाजी केली आणि ३० धावा दिल्या. तर बुमराहने ४ षटकात १४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसंच हार्दिकने फलंदाजीतही अपेक्षित अशी कामगिरी केली नाही. हार्दिकने ४ चेंडूत ११ धावा केल्या, परंतु, मुंबईला विजय मिळवून देण्यात हार्दिकला अपयश आलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा