थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rohit Shetty) दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. शनिवारी मध्यरात्री रोहित शेट्टीच्या जुहू येथील बिल्डिंगवर हा गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातून 5 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी आता संशयितांची नावं समोर आली आहेत. अमान मोरोटे ,आदित्य गायकी ,सिद्धार्थ येनपुरे , समर्थ पोमाजी आणि स्वप्नील सकट अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींना आता 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी आता नवीन CCTV व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.