आयपीएलच्या आज, शनिवारी झालेल्या RCB आणि CSK च्या सामन्यात सर्वांत वेगवान अर्धशतक आरसीबीचा स्टार खेळाडू रोमारिओ शेफर्डनं ठोकलं आहे. केवळ 14 चेंडूंमध्ये शेफर्डने हे अर्धशतक केलं आहे. सहा सिक्स आणि चार चौकार मारलं त्याने हा विक्रम केला आहे. त्यामुळे हा यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरला आहे. विशेष म्हणजे शेफर्डनं हे अर्धशतक ठोकून अनेक विक्रमही आपल्या नावे केले आहेत.
आरसीबीच्या 18 व्या ओव्हरआधी रोमारिओ शेफर्ड हा एक-दोन धावा घेत होता. मात्र 19 आणि 20 व्या ओव्हरमध्ये त्याने जोरदार फटकेबाजी सुरू केली. अवघ्या 12 बॉलमध्ये 52 धावा केल्या. त्याने आयपीएल 2025 मधील सर्वात वेगवान अर्धशतक केलं आहे. फ्रेंचायजी क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये केलेल्या या सर्वांधिक धावा आहेत. त्यामुळे शेफर्डने हा नवीन रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.