ताज्या बातम्या

Junnar : चिमुकल्या भावंडांची दोन दिवसांत पाच किल्ल्यांवर विजयाची मोहिम

अवघ्या साडेचार वर्षांच्या रोनक आणि ११ वर्षांच्या सुमेध मडके या चिमुकल्यांनी दोन दिवसांत तब्बल पाच किल्ल्यांवर एकत्र प्रवास केला. एका खिंडीत यशस्वी पायपीट करत एकूण २७ किमीचा रोमांचकारी ट्रेक पूर्ण केला आहे.

Published by : Team Lokshahi

अवघ्या साडेचार वर्षांच्या रोनक आणि ११ वर्षांच्या सुमेध मडके या चिमुकल्यांनी दोन दिवसांत तब्बल पाच किल्ल्यांवर एकत्र प्रवास केला. एका खिंडीत यशस्वी पायपीट करत एकूण २७ किमीचा रोमांचकारी ट्रेक पूर्ण केला आहे. त्यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोनक आणि सुमेध हे जुन्नर वन विभागातील वनपाल श्री. शशिकांत मडके यांची मुले आहेत. सुट्टीच्या काळात मुलांना गडकिल्ल्यांचे प्रत्यक्ष दर्शन दाखवले पाहिजे. दोघांमध्ये इतिहासाविषयी आत्मियता निर्माण व्हावी, या उद्देशाने मडके कुटुंबीयांनी गडदौऱ्याचे नियोजन केले होते.

सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्याची सोशल मीडियावरील रील पाहून रोनक व सुमेधने तेथे जाण्याचा हट्ट धरला. त्यांच्या उत्साहाला प्रोत्साहन देत वडिलांनी दोन दिवसांची रजा घेऊन कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांची सफर घडवून आणली. पहिल्या दिवशी त्यांनी अजिंक्यतारा व सज्जनगड या दोन किल्ल्यांची सर केली. अजिंक्यताऱ्यावर रोनकने उत्स्फूर्तपणे शिवगर्जना दिली.

दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, पावनगड, विशाळगड तसेच पावनखिंड येथे भ्रमंती केली. पन्हाळागडावर रात्रीचा मुक्काम करत, गाइडच्या मार्गदर्शनाखाली गडाची सखोल माहिती घेतली. पावनखिंड येथे बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीला अभिवादन करुन त्यांच्या कठीण उतारावरून मार्गक्रमण करत खिंड मोहीम पूर्ण केली. विशाळगडावर संभाजीराजांचे निवासस्थान व ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घेऊन त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. या साहसात रोनकने आतापर्यंत २७ आणि सुमेधने ४६ किल्ल्यांवर यशस्वी सफर पूर्ण केली आहे. मुलांच्या या धाडसाला केवळ कौटुंबिकच नव्हे, तर सामाजिक स्तरावरही मोठा प्रतिसाद मिळत आहे. लहान वयातच इतिहासाशी नाळ जोडत त्यांनी इतर मुलांच्या समोर या कृतीमधून एक प्रेरणादायक उदाहरण दिले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा