ताज्या बातम्या

आरपीआयला दोन जागा द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची भाजपकडे मागणी; म्हणाले,"शिर्डी मतदारसंघातून..."

Published by : Team Lokshahi

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जागावाटपाबाबत खलबतं सुरु आहेत. महायुतीचा जागावाटपाचा तिढा अजूनही सुटला नसताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आरपीआयला लोकसभा निवडणुकीत दोन जागा देण्याची मागणी केलीय. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असल्याचं आठवले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

आठवले माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, महाराष्ट्रात ज्या ४८ जागा आहेत. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आरपीआय आहे. पण आरपीआयला दोन जागा मिळाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. २००९ मध्ये शिर्डी मतदारसंघातून मी पराभूत झालो होतो. यावेळी मी शिर्डी लोकसभा मतदार संघातून उभा राहण्यासाठी इच्छूक आहे. शिर्डी सोलापूर मतदारसंघासाठी आरपीआयला जागा मिळावी. यासाठी मी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झाली नाहीय. जागावाटपासाठी सर्वच पक्ष चर्चासत्र घेत असून ज्येष्ठ नेत्यांना याबाबत विचारणा करत आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि युतीच्या सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरुच असून जागावाटपाबाबत या पक्षांची भूमिका काय असणार आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

IPL 2024, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत; राजस्थानचा ५ विकेट्सने केला पराभव

Daily Horoscope 13 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या आयुष्यात होतील सकारात्मक बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 13 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"...तर तुम्हाला गुलामगिरीत राहावं लागेल"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा PM मोदींवर निशाणा

T20 World Cup: रोहित शर्माला ४ नंबरवर खेळवा, सलामीला 'या' खेळाडूला पाठवण्याचा मॅथ्यू हेडनचा टीम इंडियाला सल्ला