ताज्या बातम्या

New Rules 2025: 1 जानेवारी 2025 पासून होणार 'हे' मोठे बदल; जाणून घ्या

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2025 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2025 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे. नवीन वर्षाला सुरूवात होणार असून नव्या वर्षाच्या सुरूवातीला काही महत्वाचे बदल होणार आहे.

नवीन वर्षाच्या सुरवातीला असे अनेक बदल होणार आहेत. ज्याचा थेट तुमच्याशी संबंध आहे. थेट तुमच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे. जाणून घ्या नेमके काय बदल होणार

1) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत अनेक बदल पाहायला मिळतील. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे त्याच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेल विपणन कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हे बदल करतात.

2) 1 जानेवारी 2025 रोजी EPFO ​​कडून पेन्शनधारकांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. EPFO ​​आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून त्यांच्या पेन्शनची रक्कम काढू शकणार आहेत.

3) कारच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवणार असल्याची माहिती मिळत आहे. कार खरेदी करणे महाग होणार आहे.

4) सेन्सेक्स, सेन्सेक्स-50 आणि बँकेक्सवरून मासिक एक्स्पायरीपर्यंत बदलण्यात आले आहेत. आता दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर मंगळवारी होणार आहे.

5) वर्षाच्या पहिल्या दिवसापासून RBI शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देईल. यामुळे आता त्यांना 1.6 लाख नाही तर 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.

6) UPI 123Pay चे नियम बदलणार आहेत. 1 जानेवारीपासून हा बदल लागू होणार आहे. आता फोनद्वारे 10,000 रुपयांपर्यंतचे ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा फक्त 5,000 रुपये इतकी होती.

7) ॲमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. एका अकाऊंटवरून फक्त दोन टीव्हीवर प्राइम व्हिडिओ स्ट्रीम होऊ शकतील. प्राइम व्हिडिओ दोन पेक्षा अधिक टीव्हीवर पाहायचा असेल तर त्याला नवे सबस्क्रिप्शन घ्यावे लागले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?