ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून 'या' नियमांत होणार मोठे बदल; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

देशात 1 एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरु होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

देशात 1 एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. याचा थेट सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. एलपीजी गॅस, UPI व्यवहारांशी संबंधित नियम, क्रेडिट कार्ड, बँक खाती यासंबधित सर्व नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार असून जाणून घ्या नेमके काय बदल होणार

एलपीजी आणि CNG दरांमध्ये बदल

गॅस, तेल वितरण करणाऱ्या कंपन्या 1 तारखेला आपले नवे दर ठरवतात. LPG गॅसच्या किमती सध्या स्थिर आहेत, त्यामध्ये नवीन दर लागू होऊ शकतात. यासोबतच CNG गॅसच्या दरांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.

UPI व्यवहारांमध्ये नवीन नियम

ज्या मोबाईल नंबरवर UPI खाते लिंक केले आहे मात्र ते चालू नाही, ते बँक रेकॉर्डमधून काढून टाकले जाईल. त्यामुळे जे मोबाईल नंबर युपीआयशी लिंक सक्रिय नाहीत ती युपीआय खाती बंद करण्यात येणार

क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल

एअर इंडियाने सिग्नेचर पॉइंट्स 30 वरून 10 पर्यंत कमी करण्याची घोषणा केली असून SBI SimplyClick क्रेडिट कार्डाने Swiggy रिवॉर्ड पॉइंट्स 10 पटवरून 5 पट करण्याचे ठरवले आहे.

बँक खात्यांमध्ये महत्त्वाचे बदल

एसबीआय तसेच पीएनबी सारख्या बँकांनी आपल्या शिल्लक रकमेत बदल केला आहे. किमान शिल्लक रकमेची नवी मर्यादा ठरवली जाणार आहे. खात्यात आवश्यक रक्कम नसेल, तर दंड आकारला जाईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा