Pravin Darekar : '1 नोव्हेंबरचा मोर्चा म्हणजे नौटंकी..." विरोधकांच्या 'विराट मोर्चा'वर सत्ताधारांची टीका  Pravin Darekar : '1 नोव्हेंबरचा मोर्चा म्हणजे नौटंकी..." विरोधकांच्या 'विराट मोर्चा'वर सत्ताधारांची टीका
ताज्या बातम्या

Pravin Darekar : '1 नोव्हेंबरचा मोर्चा म्हणजे नौटंकी..." विरोधकांच्या 'विराट मोर्चा'वर सत्ताधारांची टीका

यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मविआ आणि मनसेच्या मोर्चावर टीका केलीये. "1 नोव्हेंबरचा मोर्चा म्हणजे नौटंकी असल्याचं त्यांनी म्हटल आहे."

Published by : Riddhi Vanne

BJPVsOpposition : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या सकाळी दहा वाजता गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये मतदारयादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन केले होते. या सभेच्यावेळी राज ठाकरेंनी दुपारी 3 वाजता शिवसेना भवनात सर्वपक्षीय विरोधकांची पत्रकार परिषदेची घोषणा केली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत असे अनेक लोक उपस्थितीत होते. या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी 1 नोव्हेंबरला विराट मोर्चाचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सत्ताधारांनी चांगले खडेबोल सुनावले आहेत.

यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मविआ आणि मनसेच्या मोर्चावर टीका केलीये. "1 नोव्हेंबरचा मोर्चा म्हणजे नौटंकी असल्याचं त्यांनी म्हटल आहे. फक्त गोंधळ घालण्यासाठी मोर्चे काढण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय . तर याद्यांबद्दल प्रश्न असेल तर आयोगाकडे तक्रार करा.."असा सल्लाही दरेकर यांनी विरोधकांना दिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा