या कार्यक्रमाला सकाळी 10 वाजल्यापासून सुरवात झाली असून या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहिले आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. यासह पश्चिम महाराष्ट्रच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर यावेळी येथे त्यांनी रुपाली ठोंबरे उपस्थित होत्या.
रुपाली चाकणकर आणि तुम्ही महिलांच्या प्रश्नासाठी एकाचं व्यासपीठावर एकत्र येणार का ? यावर रुपाली ठोंबरे म्हणाल्या. "मी आधीच्या पक्षात असताना त्या माझ्या रूपाली चाकणकर माझ्या छान मैत्रिणी होत्या,पण आता राष्ट्रवादी मध्ये आल्यनानंतर महिला महिलेची दुश्मन असेल तर तिला सुधारण्याचे काम आहे आणि ते मी करते. मुळात राजकारणात महिला कमी येतात पण ज्या येतात पण मला असं वाटत एक व्यक्ती एक पद द्या मला प्रदेशाध्यक्ष देऊ नका पण आयोगाच्या आमच्या ताई आहेत एखाद्याला एकच पद द्या बरेच पद त्यांच्याकडेच नको, आणि पाहायला गेलं तर सगळ्याच बहिणींना एकत्र घेऊन चालला तर मला काही अडचण नाही पण त्यात राजकारण करत असाल तर चुकीचा आहे.